पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक मागणी करिता, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पांडव यांनी पंचायत समिती कार्यालयावर पालकांसहीत धडक देऊन शिक्षकाची मागणी केली होती. काही दिवस शिक्षक सुद्धा शाळेवर आलेत मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने आज दिनांक दहा डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजताचे दरम्यान धनंजय पांडव यांनी जिल्हा परिषद शाळेतून सुविधेचा आढावा घेतला. मुख्याध्यापकाशी चर्चा करून कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला