आज दि 13 जानेवारी सकाळी 11 वाजता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंत्री संजय शिरसाट यांनी छोट्या सभा व रॅलींच्या माध्यमातून जनतेत जोश निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत जनतेतील ताकदीमुळेच विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला. ओवेसी यांच्या विधानांवर टीका करताना त्यांचा राजकारणाचा पाया जातीयतेवर असून त्यांच्या भागातच काँग्रेसला पसंती मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार यादी व्हायरल होण्याची घटना अत्यंत धक्कादायक असून अशी यादी जाहीर होणे म्हणजे मत विकत घेतल्याचे सिद्ध होत