वर्धा: साहस,संतुलन,कौशल्य व शक्तीचा संगम: मल्लखंबाच्या थराराने साजरा झाला हिंदी विद्यापीठाचा २९वा स्थापना दिवस..
वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने आपला २९वा स्थापना दिवस एका विशेष आणि ऊर्जस्वी पद्धतीने साजरा केला. या निमित्ताने विद्यापीठाच्या मेजर ध्यानचंद क्रीडा संकुलात भारतीय पारंपारिक खेळाचा थरार पाहायला मिळाला. निमित्त होते भव्य 'मल्लखंब' प्रदर्शनाचे! असे आज 10 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे आयोजित या प्रदर्शनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी भूषवले.