आर्णी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरट्याला अटक करून तब्बल ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली आहे. दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी संदीप उत्तम चव्हाण वडगाव रा. दिग्रस यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरीस गेल्याबाबत आर्णी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास हाती घेतला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सचिन संदीप सुकळकर उर्फ आकाश वय 32