वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील ऐतिहासिक सीएडी (CAD) कॅम्पमधील प्रसिद्ध भैरव बाबा मंदिरात आज भक्तीचा महासागर लोटलेला पाहायला मिळाला. निमित्त होते 'पौषमास महोत्सवाचे'. शिस्त आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम आज या लष्करी परिसरात अनुभवायला मिळाला. असे आज 10 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहेपहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. भजनांच्या सुरावलीत आणि मंत्रोच्चारात 'शाही होम-हवन' व 'महाअभिषेक' पार पडला.