औसा: तालुक्यात टंचाईचे सावट; दोन गावांत टँकर तर १८ अधिग्रहण, यंत्रणेची लगबग सुरू : पाच तलावांसह एका प्रकल्पाचे पाणी आरक्षित
Ausa, Latur | Mar 16, 2024 यंदा पाऊसकाळ कमी झाल्याने मार्च महिन्यातच तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, लामजना व खरोशात टैंकरने पाणीपुरवठा होत असून, १८ गावांत २६ ठिकाणी विहीर, विंधन विहीरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आगामी काळात सर्वत्रच पाण्याची परिस्थिती बिकट होणार असल्याने प्रशासन सतर्क झाले असून, तलावातील पाणीसाठा आरक्षित करण्यात येत आहे. तसेच अधिग्रहण, टँकरची मागणी करणाऱ्या गावांची तहसीलदार व त्यांच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे.