लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सतरंजीपुरा परिसरात शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने खळबळ माजली आहे. आदिल हारून नागानी नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता.स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.