जिंतूर नगरपरिषद निवडणूकीसाठी दोन डिसेंबरला झालेल्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन व मतपेट्या आता आयटीआय कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी एसआरपीएफचे 9, स्थानिक पोलिसांचे 16 जवान असे एकूण 25 जवान आवारात 24 तास तैनात असल्याची माहिती जिंतूर निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली.