परळी: परळी नगर परिषदेतील कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघड करणार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दीपक देशमुख यांचा आरोप
Parli, Beed | Nov 20, 2025 कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड करण्यास आम्ही तयार!" - दीपक देशमुख परळी नगर परिषदेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची तयारी आमच्या टीमने पूर्ण केली आहे, असा गंभीर आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते दीपक देशमुख यांनी माध्यमांसमोर जोरदार प्रतिक्रिया दिली. देशमुख म्हणाले की, "मला सतत धमक्या येतात, दबाव आणण्याचा प्रयत्न होतो... पण मी गिधड धमकीला घाबरणार नाही. परळीच्या जनतेला वर्षानुवर्षे भीती दाखवून दाबून ठेवले गेले, पण आता आम्ही आधार म्हणून पुढे आलो.