मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जनजागृती संदेश.
डेंग्यू,मलेरियाआणिचिकनगुनिया हे डासांमुळे पसरतात.
लक्षणे आणि चिन्हे: ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, थंडी वाजणे, उलट्या, डोळ्यांमागे वेदना, त्वचेवर लाल चट्टे, ही डेंग्यू व व्हायरल तापाची लक्षणे.तर मलेरियामध्ये विशेषतः थंडी वाजून ताप येणे हे सर्वात महत्त्वाचे चिन्ह दिसते. प्रतिबंधात्मक उपाय :~ घरात व आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. जुन्या टायर, कॅन, बादल्या, कुलर, फुलदाण्या यातील पाणी दर आठवड्याला बदला.दरवाजे–खिडक्यांना जाळ्या लावा.संध्याकाळनंतर पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा.उपचार: ताप आल्यास घरगुती उपचारांवर वेळ वाया घालवू नका.लगेच आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्या.