२४ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे जी.ई.एस.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,रावणवाडी येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार विनोद अग्रवाल,जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सभापती डॉ.भगत आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग व मॉडेल्स पाहून त्यांची जिज्ञासा, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद वाटला.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होणार आहे.