हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केट यार्ड मध्ये आज ३६२ वाहनातून कापूसाची आवक झाली असून यावेळी याठिकाणी हंगामातील कापसाला सर्वाधिक खाजगी भाव ८ हजार ६५ रुपये देऊन कापसाची खरेदी करण्यात आली आज सीसीआयकडे याठिकाणी फक्त १९ वाहन आले होते त्यांनी कापूस खरेदीचे दर सर्वाधिक ८ हजार १० रुपये होते. यापेक्षा खाजगी दरात वाढ झाली आहे. यामुळे खाजगी बाजारात कापूसाची दरवाढ होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.