खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर आमदार प्रशांत बंब यांनी आज दि २२ डिसेंबर रोजी रात्री ७:३० वाजता कार्यकर्त्यांना धीर देत सकारात्मक संदेश दिला.पराभवाला निराशेचे कारण न मानता नव्या ताकदीने काम सुरू करण्याचे त्यांनी आवाहन केले.जनतेशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देण्यावर त्यांनी भर दिला.संघटना अधिक मजबूत करून पुढील काळात प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.