यवतमाळ: पालिका निवडणुकीत समाजकारणाला डावलल्याची ' गुरुदेव युवा संघची भावना
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणुकीत जनता जनार्धनाच्या निर्णयाचे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष तसेच प्रभाग २९ चे अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी स्वागत केले.परंतु,निवडणुकीत समाजकारणापेक्षा घराणेशाही आणि पैश्याच्या राजकारणाने ही निवडणूक गलिच्छ केली,अशी संतप्त टीकाही त्यांनी केली.आज स्थानिक विश्राम भवनात आयोजित आत्मचिंतन बैठकीत ते बोलत होते.