घाटाळबारी फाट्याजवळ दुचाकीवर जातांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलीसात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.