दक्षिण सोलापूर: विभागीय रेल्वे कार्यालय सोलापूर येथे शिवीगाळ करून मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
सोलापूर येथील विभागीय रेल्वे कार्यालय येथे एका कर्मचाऱ्याने त्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवीगाळ करून मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी याबाबतीत सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.