यवतमाळ: जांब मार्गावर एका महिलेवर प्राणघातक हल्ला,आरोपीविरुद्ध अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल
यवतमाळ शहरातील जांब मार्गावर किरकोळ वादातून एकाने महिलेवर चाकू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली.प्रीती देवतळे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले.तसेच महिलेच्या तक्रारीवरून आरोपी जयराम पवार यांच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.