कंधार: नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील बारूळच्या तळ्यामध्ये राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेचा थरार
Kandhar, Nanded | Nov 27, 2025 आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान नांदेडच्या कंधार तालुक्यातील बारूळ येथे बाराव्या ड्रॅगन बोट राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल आहे. या स्पर्धेत भारतातील 24 राज्यांनी सहभाग नोंदवला असून महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, मणिपूर, केरळा अशा विविध राज्यातील संघातील 700 खेळाडूंनी सहभाग घेतला आहेत. 2026 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या संघातून विशेष खेळाडूंची निवड होणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे संयोजक दिनेश मुंडे यांनी दिली आहे.