रोटाव्हेटरद्वारे शेतात मशागत सुरु असताना रोटाव्हेटरमध्ये अडकलेले गवत काढत असताना कृषी पदवीधर तरुण शेतकऱ्याच्या अंगावर रोटाव्हेटर पडून मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे घडली.युवराज दिलीप वाकचौरे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांचा एकुलता एक मुलगा होता.