पारोळा --येथील होमगार्ड युनिटतर्फे ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातून पथसंचलन काढण्यात आले. भारतात होमगार्डची स्थापना ६ डिसेंबर १९४६ रोजी मुंबईत जातीय दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने झाली होती. आज ही स्वयंसेवी संस्था पोलिस दलाला मदत करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सेवा करण्यासाठी कार्यरत आहे.