आमगाव: करंजी व बुराडीटोला येथील दोन मुलींचे अपहरण
Amgaon, Gondia | Dec 21, 2025 आमगाव तालुक्यातील ग्राम बुराडीटोला व करंजी या गावांतून प्रत्येकी एक अशा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण शुक्रवारी (दि. १९) दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. त्या दोघी ग्राम कातुर्ली येथील शाळेत अकरावीत शिक्षण घेत होत्या. या घटनेसंदर्भात अज्ञात आरोपीवर आमगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.