वर्धा शहरालगत असलेल्या दत्तपूर चौरस्त्यावर आज एक अत्यंत विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली. एकाच वेळी 3 कार एकमेकींना धडकल्याने या भागात मोठी खळबळ उडाली. या अपघातात 3 कारचे प्रचंड नुकसान झाले असले, तरी सुदैवाने एक मोठी जीवितहानी टळली आहे. सदर अपघात 28 डिसें रोजी घडला असल्याचे रात्री 8 वाजता सांगण्यात आले दत्तपूर चौक हा वर्धा शहरातील तीन मुख्य रस्त्यांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या चौरस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा नेहमीच गोंधळ उडतो.