कळंब-चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटातील हजारो महिलांसाठी भक्ती आणि श्रद्धेचा आगळावेगळा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. * सौ. तुलसीताई सचिन भोर,सौ. उषाताई रमेश कानडे आणि सौ. सीमाताई रमेश खिलारी यांच्या विशेष पुढाकारातून 'भक्ती-शक्ती' यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी २३ बसेसमधून हजारो महिला भाविक दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत.