भंडारा: वरठी येथे ५१ वर्षीय व्यक्तीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या; शहरातील पडोळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी अशोक सोमाजी तितिरमारे (वय ५१) या व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दिनांक १४ नोव्हेंबर रोजी ११:३० वा. दरम्यान मृतक अशोक तितिरमारे यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे प्रकृती बिघडल्याने त्यांना १५ नोव्हेंबर रोजी १२:५० वाजता उपचारासाठी पडोळे हॉस्पीटल, भंडारा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच दिनांक १८ नोव्हेंबर रोजी ३ वाजता दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.