चाळीसगाव (प्रतिनिधी): धुळे-चाळीसगाव-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर मंगळवारी दुपारी एका भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. या कठीण प्रसंगी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नानजीधाम) यांची विनामूल्य रुग्णवाहिका सेवा देवदूत ठरली असून, जखमी तरुणाला वेळीच उपचार मिळवून देण्यात आले आहेत.