कसबे सुकेणे येथे गेल्या गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर एका रिक्षातून आलेल्या तिघांनी एका शाळकरी विद्यार्थिनीला रिक्षात ओढण्याचा प्रयत्न केला, जागृत नागरिकांमुळे ही घटना उघडकीस आली, त्यानंतर संतप्त नागरिकांनी नशेत असलेल्या महिला व दोन पुरुषांना चोप देत त्यांना पोलिसांच्या हवाली केले होते, मात्र प्रथमदर्शनी अपहरणाची घटना असली तरी पोलिसांनी या संशयित तिघांवर विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती ओझर पोलिसांनी आज दि. 5 रोजी दु. 4 वाजता दिली.