वसई: साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार महापालिका व यंग मॅन्स कॅथोलिक असोसिएश तर्फे वायएमसीए येथे साहित्य जल्लोष कार्यक्रम
Vasai, Palghar | Jan 19, 2025 मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी तसेच मराठी भाषिकांनी आपला भाषेविषयी असणारा न्यूनगंड दूर करत मराठी भाषेत असलेले ज्ञान आणि संचित यांचा अनुभव घ्यावा. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी वसईत व्यक्त केले. साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि वसई विरार महापालिका तसेच यंग मॅन्स कॅथोलिक असोसिएशन (वायएमसीए) तर्फे साहित्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शोभणे बोलत होते. वसईच्या माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.