राज्यभर खळबळ उडविणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आरोपींच्या मुसक्या आवळणे सायबर पोलिसांकडून सुरू आहे. सायबर पोलिसांनी हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक केली.अटकेतील आरोपी मुख्याध्यापिकेचे नाव मेघा श्रीकृष्ण मते, रा. हिंगणा असे आहे. मेघा मते या कान्होलीबारा येथील ग्रामोद्धार विद्या प्रसारक शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीमती चित्रलेखादेवी भोसले उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे.