सेलू: सेलू शहरातील तीन केंद्रांवर नवोदय प्रवेश परीक्षा; तालुक्यातील ७५८ विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती
Seloo, Wardha | Dec 13, 2025 जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे रविवारी (ता. १३ डिसेंबर) सकाळी ११.३० वाजता घेण्यात आलेली प्रवेश परीक्षा शहरातील तीन केंद्रांवर शांततेत पार पडली. तालुक्यातील एकूण ८०२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी ७५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली, तर ४४ विद्यार्थी गैरहजर राहिले. ही परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय, सेलू (काटे) येथे इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी घेण्यात आली.