रत्नागिरी: भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी शनिवारी सर्वांनी सहभाग नोंदवावा : निवासी उपजिल्हाधिकारी
पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाच्या सूचनेनुसार भाट्ये समुद्रकिनारा येथे २० सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसोबतच या ठिकाणी एक पेड माॕ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे..