तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या सहा एकर कांद्यात ट्रॅक्टरने रोटा फिरवला. शेतकरी शिंदे यांनी केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचा निषेध केला. तसेच सरकारची नवीन जी ध्येयधोरण आहेत, ते शेतकरी विरोधी आहेत, असा आरोप करत त्यामध्ये तत्काळ बदल करावा, अशी मागणी केली. त्यांनी या नुकसानीला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. यावेळी बोलतांना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तराळले होते.