किती ही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहणार - काँगेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड
माझ्या राजाच्या शब्दाखातर जागले ते खरे मावळे, आजचे धूर्त सरकार केवळ सत्ता नि पैशांच्यामागे धावले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी आहे. या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. जी घटना घडली, त्यामागे जे दोषी आहेत त्यांना सोडून इकडे आमच्या मागावर पोलीस फौजफाटा पाठवलाय. किती ही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहणार. धिक्कार असो या सरकारचा. अशी टीका आज दुपारी १२.३० वाजता काँगेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.