आष्टी: बीड अहिल्यानगर महामार्गावर आष्टी तालुक्यात बिबट्या आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल
Ashti, Beed | Nov 20, 2025 "रात्री-अपरात्री प्रवास करताना जीव मुठीत धरा!" बीड आणि अहिल्यानगर राज्य महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आष्टी वनपरिक्षेत्र हद्दीत बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे आता ते शेत आणि लोकवस्तीसह थेट महामार्गावर येत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.रात्रीच्या दरम्यान कानिफनाथ घाटात बिबट्या पुन्हा एकदा प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे नागरिकांना खबरदारी देण्याचे वनविभागाने आवाहन केले आहे.