पुणे शहर: आंदेकर कुटुंबीयांना महानगरपालिका निवडणूक लढण्यास परवानगी; पण मिरवणूक, भाषण, घोषणाबाजीस मनाई
आयुष कुमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक प्रचार यात्रा भाषण घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत