प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री संत केजाजी महाराज यांच्या ११९ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित सप्ताह सोहळ्याची धार्मिक पर्वणी सध्या मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, हरिपाठ, प्रवचन आदींनी गावाचे वातावरण भक्तिरसाने ओथंबून गेले आहे. मंगळावर दि. २० रोजी सायंकाळी ५ वा. खा. अमर काळे यांनी मंदिराला भेटदिली