रामटेक तालुक्यातील काचुरवाही शिवारात शेतात ठेवलेल्या धान्याच्या गंजीला अज्ञात इसमा द्वारे आग लावण्यात आल्याचा आरोप करीत या आगीत 60 बोरे धान जळून खाक झाल्याची माहिती शेतकरी मनोहर गगरू नाटकर वय 58 वर्षे रा. काचुरवाही यांनी दिली. याप्रकरणी अज्ञात इसमां विरुद्धात पोलीस स्टेशन रामटेक येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना 24 डिसेंबरच्या मध्यरात्री घडल्याचे सांगण्यात आले आहे.