नांदुरा: नगर परिषद निवडणूक अपडेट– नगराध्यक्ष पदाकरिता 15 तर 25 नगरसेवक पदासाठी 220 उमेदवारी अर्ज
नांदुरा नगरपरिषद निवडणूक अर्ज भरण्यासाठी आज १७ नोव्हेंबर शेवटची तारीख होती दरम्यान नांदुरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर नगरसेवक पदांच्या 25 जागेसाठी एकूण 220 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.नांदुरा नगरपालिकेचे निवडणुकीत आता चांगलीच रंगत पहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टी आणि नगर विकास आघाडी मध्ये वाटणारी लढत आता अपक्ष म्हणून निवडणूक लढत असलेले लाला इंगळे यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.