दारू पाजण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यांतर्गत यादव चौक परिसरात घडली.जयकिशन उर्फ शुभम दीपक मोरे (२७, रा. झोपडी मोहल्ला, यादव चौक) हा पाण्याची बाटली खरेदी करण्यासाठी यादव चौकातील किराणा दुकानात गेला होते. तेथे आरोपी अर्जुन राम राऊत (२२, रा. सुंदरनगर) याची भेट झाली व अर्जुनने त्यास दारू पाजण्याची मागणी केली.