भंडारा: प्रचार गाड्यांचा कर्कश कहर! आवाजामुळे नागरिक त्रस्त; नियंत्रणाची मागणी तेज
जिल्ह्यात निवडणुकीचा माहोल रंगत असताना प्रचार गाड्यांच्या कर्कश आणि सुसाट आवाजामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील विविध भागांत सतत फिरणाऱ्या प्रचार वाहनांवरील मोठे भोंगे, डीजेचा प्रचंड आवाज आणि धावता प्रचार यामुळे नागरिकांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत होत आहे. विशेषत: लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर या प्रचंड आवाजाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.