भंडारा: भंडाऱ्यात निघाली हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा....विविध झांकीनं वेधलं नागरिकांचं लक्ष....
भंडारा शहरात हनुमान जयंतीनिमित्त मंदिर जीर्णोधार संकल्पित हनुमान जन्मोत्सव समितिच्या वतीनं ही शोभायात्रा काढण्यात आली. भंडारा शहरातील शिवाजी पुतळा परिसरातून काढण्यात आलेली ही शोभायात्रा हनुमान मंदिर पर्यंत काढण्यात आली. या शोभायात्रेत हनुमान आणि पौराणिक वेशभूषेतील बालकलाकार सहभागी झाले होते. शोभायात्रेतील एका मिनी ट्रॅक्टरवर स्वतः खासदार सुनील मेंढे स्वार होत तो संपूर्ण मिरवणुकीत त्यांनी चालविला. यावेळी हनुमानजींचा जयघोष होत असल्यानं संपूर्ण वातावरण बजरंगमय झालं होतं.