महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता धारकांसाठी यंदाचे आर्थिक वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिकेकडून थकबाकीसह मालमत्ता कराची देयके आधीच निर्गमित करण्यात आली आहेत. यावर्षी कर आकारणी प्रक्रियेत प्राप्त झालेल्या विविध हरकतींचा विचार करून संबंधित विभागाने अनेक मालमत्तांच्या करामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केले असून सुधारित देयके मालमत्ता धारकांना उपलब्ध करून दिली आहेत.