पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पिपरिया शेतशिवारात मंगळवार दि. 6 जानेवारीला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान टीयुआई -08 वाघाने हल्ला करून 45 वर्षीय संगीता गोपीचंद वाघरे रा.पिपरिया हिला ठार केले होते. त्या नरभक्षी वाघाला वनविभागाने तातडीने बुधवार दि. 7 जानेवारीला ॲक्शन मोड मध्ये येऊन जेर बंद केल्याने परिसरातील नागरिकांना तूर्तास मिळाला दिलासा मिळाला आहे.