इंदापूर: निमगावातील दोघेजण एक वर्षाकरीता तडीपार
Indapur, Pune | Nov 15, 2025 इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील दोन सराईत गुन्हेगारांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापुरसह, बारामती, पुरंदर, दौंड व हवेली तालुक्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.