दि.10 जानेवारीला शनिवारला सायं.4:30 वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलच्या अपघातात चौघे जखमी झाले.प्राप्त माहितीनुसार शनिवारी गोरेगावात आठवडी बाजार असल्यामुळे मोठी वर्दळ होती.पल्लवी मेडिकलच्या पुढे भरधाव वेगाने येत असलेल्या पल्सर गाडीने गोंदियाच्या दिशेने टर्न होत असलेल्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिली.गोंदियाच्या दिशेने टर्न होणाऱ्या दुचाकीच्या चालकाने मागेपुढे न पाहिल्याने अपघात झाला.या अपघातात चौघेजण जखमी झाले.त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.