भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे १५ जानेवारी २०२६ पासून "प्रकल्प दिशा" उपक्रम सुरू होत आहे. याद्वारे UPSC व MPSC (गट अ व ब) च्या विद्यार्थ्यांना पुण्याच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे मोफत ऑनलाइन क्लासेस, नोट्स आणि मॉक टेस्ट्स उपलब्ध करून दिल्या जातील. हे मार्गदर्शन 'प्रकल्प दिशा' यूट्यूब चॅनल आणि वेबसाईटच्या माध्यमातून मिळेल, ज्यामध्ये दरमहा शंका निरसन सत्रांचाही समावेश असेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी QR कोडद्वारे आपली नाव नोंदणी करावी. 📲 Register now via the QR code or call 9405240584 to join us!