नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या तक्रारींस अनुसरून मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहून दाखल करुन घेतलेली जनहित याचिका क्र.3/2023 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दि.11/12/2023 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू प्रदूषण कमी करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मान्यतेने दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने एकूण 85 प्रकल्पांपैकी 18 प्रकल्पांच्या विकासकांनी मानक कार्यप्रणालीतील प्रमुख बाबींची पूर्तता न केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित प्रकल्पांना महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने बांधकाम स्थगिती आदेश देण्यात आलेले आहेत.