चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे. या गावातील रहिवासी भाग्यश्री अशोक पाटील वय १९ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी कॉलेजला जात आहे. असे सांगून घरून निघालेली ही तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून अडावद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.