आज दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोंदिया येथील सिव्हिल लाईन मधील श्री हनुमान मंदिर आणि शहरातील देशबंधू वॉर्ड येथील श्री शनी मंदिरात जाऊन खासदार प्रफुल भाई पटेल यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील तसेच गोंदिया जिल्ह्यातील जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी, सुख-शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.