भारतीय राष्ट्रीय उपभोगता सहकारी संघ मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी उत्पन्न बाजार समिती, काटोल येथे सोयाबीन खरेदीचा रीतसर शुभारंभ आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावाचा आधार मिळणार आहे.खरेदीच्या पहिल्या दिवशी खामली येथील शेतकरी रामाजी राऊत यांनी आपले सोयाबीन विक्रीसाठी आणले होते.