सततची नापिकी, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आणि वाढता कर्जबोजा या विवंचनेतून एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील आकोली येथे घडली. ही घटना शुक्रवारी (ता. १९ डिसेंबर) सकाळी सुमारे १० वाजता उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव भीमराव कुडमते (वय ४७, रा. आकोली) असे आहे. याबाबत दुपारी १ वाजता सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.